Monday, May 3, 2010

मेहेंदळ्यांची कुलदेवता - श्री मुसळादेवी, मालगुंड




शुक्रवार-शनिवार मस्त कोंकण दौरा केला... निमित्तं होतं, आमची कुलदेवता श्री मुसळादेवीचं दर्शन....
गेली अनेक वर्षे आमच्यासारखे अनेक मेहेंदळे कुलदेवतेच्या स्थानाबद्दल अनभिद्न्य होते...
परंतु मेहेंदळ्यांच्या मूळ गावी - मालगुंड येथे कॅनडा येथे राहात असलेल्या मेहेंदळ्यांच्या प्रेरणेतून आणि श्री अमित मेहेंदळे यांच्या पुढाकाराने गावातल्या अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या श्री ओंकरेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासोबत, त्याच्या premisesमध्ये श्री मुसळादेवीचं मंदिर बांधलं. त्यामुळे देवीचं मूळ स्थान माहित नसलं तरी आम्हाला दर्शनासाठी एक स्थान उपलब्ध झालं. अनेक मेहेंदळ्यांनी आवाहनाला प्रतिसाद देऊन सढळ हस्ते मदत केली आणि श्री ओंकरेश्वर जिर्णोद्धारासोबतच श्री मुसळादेवीचं मंदिर उभं राहिलं. यासाठी अमितने खूप मेहनत घेतली. वेळप्रसंगी स्वत:ची लॅब बंद ठेऊन निधीसाठी फिरलाय... पुण्यात, ठाण्यात मेहेंदळे संमेलनं घेतली... आणि त्याच्या अथक प्रयत्नांतून हे सर्व साकारलं.
त्यासाठी त्याला सर्व मेहेंदळ्यांनी उत्तम साथ दिली. पुण्यातून इतिहास संशोधक श्री गजानन भास्कर मेहेंदळे, सरदार आप्पा बळवंत मेहेंदळे यांचे वारस श्री हरीहर मेहेंदळे, पेशव्यांचे वारस श्रीमंत कॄष्णाजी पेशवा, मेहेंदळे गॅरेजचे श्री श्याम मेहेंदळे, सिद्धार्थ मेहेंदळे, तळेगांवचे मेहेंदळे, कॄष्णाजी मेहेंदळे, सौ मेधा मेहेंदळे, सौ. मानसी मेहेंदळे, यांच्याबरोबर अनेक मेहेंदळ्यांनी हातभार लावला... आता त्या मंदिरात नियमीतपणे पूजा अर्चा होते....
शुभकार्याची सुरुवात करतांना आता श्री मुसळादेवीचे आशीर्वाद घेणं सहज शक्य आहे...

2 comments:

  1. Hello DHananjay:
    I am from Malgund (my uncle still lives there). Do you know Ravi Mehendale?
    Ashok Bapat

    ReplyDelete
  2. हिंदळे मुसळादेवी

    ReplyDelete